CM विजय यांच्या विरोधी पक्ष नेत्याकडून तृषाला तब्बल १२ कोटींची ऑफर, अभिनेत्री काय निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:51 IST2026-05-14T12:50:13+5:302026-05-14T12:51:36+5:30

तृषा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता तृषाला थेट थलपती विजय यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्याकडून ऑफर आली आहे. तब्बल १२ कोटींची ऑफर विरोधक उदयनिधी स्टॅलिन यांनी तृषाला दिली आहे. 

cm thalapathy vijay opposition party dmk udaynidhi stalin offered trisha krishnan 12cr movie | CM विजय यांच्या विरोधी पक्ष नेत्याकडून तृषाला तब्बल १२ कोटींची ऑफर, अभिनेत्री काय निर्णय घेणार?

CM विजय यांच्या विरोधी पक्ष नेत्याकडून तृषाला तब्बल १२ कोटींची ऑफर, अभिनेत्री काय निर्णय घेणार?

थलपती विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर तृषा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यालाही तृषा उपस्थित होती. तृषा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता तृषाला थेट थलपती विजय यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्याकडून ऑफर आली आहे. तब्बल १२ कोटींची ऑफर विरोधक उदयनिधी स्टॅलिन यांनी तृषाला दिली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, डीएमकेचे प्रमुख आणि तामिळनाडूचे विरोधी पक्षनेता उदयनिधी स्टॅलिन यांनी तृषाला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी तब्बल १२ कोटींची ऑफर दिली आहे. या सिनेमात तिला मुख्य भूमिकेसाठी विचारणा झाली आहे. तृषाने ही ऑफर स्वीकारली की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, उदयनिधी स्टॅलिन यांनी तृषाला सिनेमाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली आहे. 


तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...

दरम्यान, तृषा एका सिनेमासाठी जवळपास १०-१२ कोटी रुपये मानधन घेते. 'पोन्नियिन सेल्वन', 'घिल्ली', 'वर्षम' यांसारख्या सिनेमांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या लियो सिनेमात विजय आणि ती एकत्र दिसले होते. अक्षय कुमारच्या 'खट्टा मिठ्ठा' सिनेमातही तृषा मुख्य भूमिकेत होती. आता तृषा 'करुप्पू' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title : सीएम विजय के प्रतिद्वंद्वी ने तृषा को 12 करोड़ का प्रस्ताव दिया; अभिनेत्री का फैसला?

Web Summary : विजय के सीएम बनने के बाद, तृषा को एक प्रतिद्वंद्वी पार्टी के नेता ने फिल्म के लिए ₹12 करोड़ का प्रस्ताव दिया। उनके फैसले का इंतजार है, जिससे राजनीतिक चर्चा शुरू हो गई है। तृषा की प्रति फिल्म फीस ₹10-12 करोड़ है। उन्होंने विजय के साथ 'लियो' में अभिनय किया।

Web Title : CM Vijay's rival offers Trisha 12 crores; actress to decide?

Web Summary : Following Vijay's CM role, Trisha is offered ₹12 crore by a rival party leader for a film. Her decision is awaited, sparking political buzz. Trisha's fee is ₹10-12cr per film. She starred in 'Leo' with Vijay.