डोळ्यात अंगार अन् हातात सिगार! रक्ताने माखलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का? नव्या सिनेमाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:10 IST2024-11-07T16:08:50+5:302024-11-07T16:10:06+5:30

२०१७ ला भारतीय मनोरंजन विश्वातील एक मोठा सुपरहिट सिनेमा या अभिनेत्रीने दिला आहे

bahubali actress anushka shetty new movie ghaati first poster out | डोळ्यात अंगार अन् हातात सिगार! रक्ताने माखलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का? नव्या सिनेमाची चर्चा

डोळ्यात अंगार अन् हातात सिगार! रक्ताने माखलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का? नव्या सिनेमाची चर्चा

सध्या भारतीय मनोरंजन विश्वात विविध सिनेमांमध्ये प्रयोगशील काम होताना दिसतंय. अशातच मल्याळम, तेलगू, तामिळ सिनेमे वैविध्यपूर्ण विषयांमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. अशाच एका नाविन्यपूर्ण सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. हा पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली गेलीय. रक्ताने माखलेली एक महिला या पोस्टरमध्ये दिसत असून तिच्या हातात भलीमोठी सिगार आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे 'बाहुबली' स्टार अनुष्का शेट्टी.

अनुष्काचा नवीन सिनेमा चर्चेत

'बाहुबली १' आणि 'बाहुबली २' नंतर अनुष्का शेट्टी ही अभिनेत्री सर्वांच्या नजरेत आली. भारतातील सिनेमांवर प्रेम करणाऱ्या तमाम प्रेक्षकांनी अनुष्कावर प्रेम केलं. परंतु 'बाहुबली'नंतर मात्र अनुष्काचे सिनेमे तितकेसे यशस्वी झाले नाहीत. परंतु नुकतंच अनुष्काच्या आगामी 'घाटी' सिनेमाचं पोस्टर भेटीला आलाय. या पोस्टरमध्ये डोळ्यात अंगार आणि हातात भलीमोठी सिगार ओढणारी अनुष्का दिसतेय. अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला आहे. 

अनुष्काचा नवीन सिनेमा कधी होणार रिलीज

अनुष्काचा आगामी 'घाटी' सिनेमा हा घोषणेपासूनच चर्चेत आहे. अशातच आज सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झाल्याने चाहत्यांना सिनेमाबद्दल उत्सुकता लागली आहे. अनेक वर्षांनी अनुष्का दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाच्या रिलीज डेटबद्दल अजून घोषणा झाली नसली तरीही पुढील वर्षी २०२५  ला सिनेमा रिलीज होईल. 'बाहुबली' स्टार अनुष्का शेट्टीला पुन्हा एकदा अनोख्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला तिचे चाहते उत्सुक आहेत.

Web Title: bahubali actress anushka shetty new movie ghaati first poster out