"आयुष्यातील १७ वर्ष मी वाया घालवली…", तीन लग्न करुनही अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, पश्चाताप करण्याची आली वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:24 IST2026-05-14T11:20:49+5:302026-05-14T11:24:22+5:30

२० वर्षात ३ लग्ने पण टिकला नाही संसार! प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची आली वेळ, म्हणाली... 

actress meera vasudevan three marriage failed regret decision says wasted 17 years of my life | "आयुष्यातील १७ वर्ष मी वाया घालवली…", तीन लग्न करुनही अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, पश्चाताप करण्याची आली वेळ 

"आयुष्यातील १७ वर्ष मी वाया घालवली…", तीन लग्न करुनही अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, पश्चाताप करण्याची आली वेळ 

South Actress Meera Vasudevan: कलाकार जेवढे त्यांच्या भूमिका,तसेच विविध कलाकृतींमुळे चर्चेत असतात. तितकेच ते त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे देखील चर्चेत येत असतात. त्यांचे रिलेशनशिप,लग्न, मुले, संपत्ती, शिक्षण याचबरोबर कलाकारांचे नातेसंबंध, वाद-विवाद, घटस्फोटो अशा अनेक कारणांमुळे कलाकारांची चर्चा होताना दिसते. अशीच मनोरंजन विश्वातील अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या अभिनेत्रीचं नाव मीरा वासुदेवन आहे. 

अभिनेत्री मीरा वासुदेवने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र,२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थनमात्रा’साठी अभिनेत्रीला आजही ओळखलं जातं. मीरा फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. वैवाहिक आयुष्यात तिने अनेक चढउतारांचा सामना केला आहे. ४४ व्या वर्षी अभिनेत्रीने तिसऱ्यांदा घटस्फोट घेतला आहे. तिची तिन्ही लग्न मोडली. त्यावर आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.  माझ्या आयुष्यातील जवळपास १७ वर्ष मी वाया घालवली, अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

धन्या वर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने म्हटलं,"मी माझ्या मुलाला नेहमी सांगते की, मी माझ्या आयुष्याची १७ वर्षे तीन अयशस्वी लग्नांमध्ये वाया घालवली. जर मी त्या वेळी समजुतदारपणाने वागले असते, तर आज मी आयुष्यात खूप काही मिळवलं असतं. मी चित्रपट, फिटनेस आणि माझ्या आवडीच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ शकले असते." 

 त्यानंतर अभिनेत्री पुढे म्हणाली," मी माझ्या आईवडील आणि बहिणीसोबत अधिक वेळ घालवू शकती असती. परंतु ती वेळ मी अशा लोकांवर वाया घालवली, ज्यांनी कधीच मला महत्त्व किंवा आदर दिला नाही.”

दरम्यान, मीरा वासुदेवने २००५ साली विशाल अग्रवालशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर ५ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यानंतर मीराने २०१२ साली जॉन कोकेन यांच्याशी संसार थाटला होता. पण, तिचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. आणि अवघ्या ४ वर्षांतच मीरा आणि जॉनचा घटस्फोट झाला. मीराला जॉनपासून अरिहा हा मुलगा आहे. त्यानंतर मे २०२४ मध्ये मीराने सिनेमॅटोग्राफर विपिन पुथियांकमसोबत तिसऱ्यांदा लग्न केलं, पण हे नातंही फार काळ टिकलं नाही.

Web Title : अभिनेत्री को 17 साल बर्बाद करने का पछतावा, तीन शादियां प्यार पाने में विफल।

Web Summary : दक्षिण अभिनेत्री मीरा वासुदेवन को तीन असफल शादियों में 17 साल बर्बाद करने का पछतावा है। उन्होंने व्यक्तिगत विकास और परिवार के साथ समय बिताने के बजाय रिश्तों को प्राथमिकता देने पर निराशा व्यक्त की। वह अपने बेटे को अपनी गलतियों से सीखने की सलाह देती हैं।

Web Title : Actress regrets wasting 17 years, three marriages failed to find love.

Web Summary : South actress Meera Vasudevan regrets wasting 17 years on three failed marriages. She expresses disappointment at prioritizing relationships over personal growth and time with family. She advises her son to learn from her mistakes.