बालपणीच मिळाली साधेपणाची शिकवण

By Admin | Updated: September 26, 2014 04:05 IST2014-09-26T04:05:11+5:302014-09-26T04:05:11+5:30

आलिया आता एक स्टार बनली आहे, पण तिच्या मते तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत

Simplicity taught in childhood | बालपणीच मिळाली साधेपणाची शिकवण

बालपणीच मिळाली साधेपणाची शिकवण

आलिया आता एक स्टार बनली आहे, पण तिच्या मते तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. पाय जमिनीवर नसले, तर त्या यशाला काहीच किंमत राहत नाही, असे तिला वाटते. आलियाला जेव्हा बालपणाबाबत विचारण्यात आले तेव्हा सांगितले की, ‘माझे बालपण सामान्य मुलांप्रमाणेच राहिले आहे. मी शाळेत गेले ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. घरातील वातावरणही खूप चांगले होते. मी काही खास प्रसंगीच डिजायनर कपडे किंवा शुज वापरत असे. असे जगण्यातही एक वेगळीच मजा आहे. असे व्हायला नको की, तुमचे एक-दोन चित्रपट चालले आणि तुम्ही स्वत:ला एक मोठे स्टार समजू लागलात. आम्ही तर बालपणीच साधेपणाने जगायला शिकलो आहोत.’ तिने सांगितले की, घरात सर्वांचीच लाडकी आहे, सर्वांनीच तिला भरभरून प्रेम दिले. त्यामुळे कुटुंबियांसोबत राहणे तिला आवडते, त्यांच्यासोबत आनंद शेअर करायला तिला आवडते.

Web Title: Simplicity taught in childhood