बिपाशा-करणचे "शुभमंगल सावधान"

By Admin | Updated: May 1, 2016 12:29 IST2016-05-01T12:29:29+5:302016-05-01T12:29:29+5:30

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर यांनी शनिवारी विधीपूर्व वैवाहीक आयुष्यात प्रवेश केला. व

"Shubhamangal alert" of Bipasha-Karan | बिपाशा-करणचे "शुभमंगल सावधान"

बिपाशा-करणचे "शुभमंगल सावधान"

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १ - बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर यांनी शनिवारी विधीपूर्व वैवाहीक आयुष्यात प्रवेश केला. वर्षभरापासून डेटींग करणारी बिपाशा आणि करण शनिवारी विवाहबद्ध झाले. दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. 
 
हा विवाह बंगाली पद्धतीने पार पडला असला तरी, बिपाशाने बंगाली वधूचा पेहराव केला नव्हता. तिने लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता. करणसिंह ग्रोव्हरने सफेद रंगाची शेरवानी परिधान केली होती. मेहेंदी, संगीतपासून सुरु झालेला हा विवाहसोहळा तीन दिवस चालला. 
 
जवळचे मित्र आणि कुटुंबिय विवाहाला उपस्थित होते. बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड डिनो मारियो या विवाहाला पहिला पोहोचला. डिनो, आर माधवन त्याची पत्नी सरीता बिर्जे या विवाहाला उपस्थित होते. स्वागत समारंभाला शाहरुख, सलमान खान आले होते. 
 

Web Title: "Shubhamangal alert" of Bipasha-Karan