सोनम-आनंदच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-रेखाचा मजेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 16:20 IST2018-05-15T16:18:50+5:302018-05-15T16:20:12+5:30
रिसेप्शनला शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंहसारखे अनेक मोठे स्टार्स आले होते. आता रणवीर सिंह आणि अभिनेत्री रेखा यांचा डान्स व्हिडीओ समोर आलाय.

सोनम-आनंदच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-रेखाचा मजेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचं लग्नाचं रिसेप्शन होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. तरी सुद्धा या रिसेप्शनमधील काही व्हिडीओ समोर येत आहेत. या रिसेप्शनला शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंहसारखे अनेक मोठे स्टार्स आले होते. आता रणवीर सिंह आणि अभिनेत्री रेखा यांचा डान्स व्हिडीओ समोर आलाय.
या व्हिडीओत रणवीर सिंह आणि रेखा यांचा एकत्र डान्स बघालया मिळत आहे. पण हा रेखा यांचा नेहमीसारखा डान्स नाहीये तर मजेदार डान्स आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशन मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. स्लो मोशनमध्ये डान्स करताना रेखा आणखीन सुंदर दिसत आहे.
याच रिसेप्शनमध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांची चांगलीच जुगलबंदी बघायला मिळाली. त्यांच्या जुगलबंदीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि सलमान खान हे दोघे अनिल कपूर यांची पत्नी सुनीता यांच्यासोबत गंमत करताना दिसत आहे.