ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 12:29 PM2024-05-07T12:29:42+5:302024-05-07T12:37:49+5:30

Salman khan: एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल हे सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही सलमान अजूनही अविवाहित आहे.

सलमानच्या अफेअरच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. मात्र, यावेळी त्याच्या प्रॉपर्टीची चर्चा होतीये.सलमानच्या अफेअरच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. मात्र, यावेळी त्याच्या प्रॉपर्टीची चर्चा होतीये.

सलमानकडे आज २३०० कोटींची संपत्ती आहे. मात्र, त्याने लग्न न केल्यामुळे त्याच्या पश्चात त्याच्या या संपत्तीचा वारसदार कोण असेल हा प्रश्न अनेकांना पडतो.

इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सलमानचं नाव आवर्जुन घेतलं जातं. सलमान आज एका सिनेमासाठी १०० ते १३० कोटी रुपये मानधन घेत असल्याचं म्हटलं जातं.

सलमानकडे अनेक अलिशान गाड्या असून मुंबईतील वांद्रे भागात त्याचा 30 कोटी रुपये किमतीचा ट्रिपलेक्स फ्लॅट आहे. या चार बीएचके फ्लॅटमध्ये वरच्या मजल्यावर स्विमिंग पूल, मधल्या मजल्यावर पार्टी हॉल व पूल टेबल आणि खालच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे.

सलमान मुंबईतील वांद्रे वेस्ट येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे २० कोटी रुपये किंमत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गोराई येथेही सलमानची प्रॉपर्टी आहे. त्याच्या ५१ व्या वाढदिवशी त्याने स्वत:ला एक बीच हाऊस गिफ्ट केलं होतं.

विदेशातही त्याची प्रॉपर्टी आहे. दुबईच्या बुर्ज खलिफाजवळील द अ‍ॅड्रेस डाउनटाऊन येथे सलमान खानच्या मालकीचं एक आलिशान अपार्टमेंट असल्याचं म्हटलं जातं.

सलमान आज अमाप संपत्तीचा मालक आहे. मात्र, त्याचं लग्न न झाल्यामुळे तो ही संपत्ती कोणाच्या नावावर करणार हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर त्यानेच दिलं आहे.

एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल हे सांगितलं. जर त्याने आयुष्यात कधीही लग्न केलं नाही तर त्याच्या संपत्तीचा अर्धा भाग ट्रस्टला दान केला जाईल. तसंच अर्धी संपत्ती त्याच्या बिंग ह्युमनला दान करण्यात येईल.