फोटोत दिसणारी खोडकर मुलगी आज सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री; ७५ व्या वर्षी गाजवतेय बॉलिवू़ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:49 IST2026-05-18T16:38:21+5:302026-05-18T16:49:15+5:30
फोटोत दिसणारी लहान मुलं किती निरागस आहेत नाही? या चिमुकल्यांमध्ये मनमुराद हसणारी एक मुलगी आज ७५ व्या वर्षीही बॉलिवूड गाजवतेय.

फोटोत दिसणारी लहान मुलं किती निरागस आहेत नाही? या चिमुकल्यांमध्ये मनमुराद हसणारी एक मुलगी आज ७५ व्या वर्षीही बॉलिवूड गाजवतेय.

त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आहेत शबाना आझमी. शबाना आझमींनी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीची फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शबाना आझमींच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील त्यांचे मित्र-मैत्रीणही कमेंट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री दिया मिर्झाने हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली, तर दिव्या दत्ताने लिहिले, "ही खोडकर मुलगी किती गोंडस आहे."

शबाना आझमी लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित आगामी ॲक्शन ड्रामा चित्रपट 'लाहोर १९४७' (Lahore 1947) मध्ये दिसणार आहेत. आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस निर्मित या चित्रपटात सनी देओल, प्रिती झिंटा, अली फजल आणि करण देओल मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट असगर वजाहत यांच्या 'जिस लाहोर नईं वेख्या ओ जम्याइ नी' या प्रसिद्ध नाटकावर आधारित असून, यात भारत-फाळणीच्या काळातील एक संवेदनशील आणि भावनिक कथा मांडण्यात आली आहे. शबाना आझमींना या चित्रपटात पाहायला त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

शबाना आझमींनी खऱ्या आयुष्यात जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं आहे. शबाना आणि जावेद याही वयात विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात

















