TMKOC: 'गोली'चे बाबाही आहेत प्रसिद्ध अभिनेते, बाप-लेकाने 'तारक मेहता...' मालिकेत एकत्र केलंय काम
By देवेंद्र जाधव | Updated: April 22, 2026 15:37 IST2026-04-22T15:15:19+5:302026-04-22T15:37:41+5:30
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत गोलीचं पात्र प्रेक्षकांना खूप आवडतं. अभिनेता कुश शाहने ही भूमिका लोकप्रिय केला. पण तुम्हाला माहितीये का कुशचे बाबाही लोकप्रिय अभिनेते आहेत. आणि दोन्ही बाप-लेकाने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत एकत्र कामही केलंय.

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका. गेली १५ हून जास्त वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेविषयी एक महत्वाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत गोलीचं पात्र प्रेक्षकांना खूप आवडतं. अभिनेता कुश शाहने ही भूमिका लोकप्रिय केला. पण तुम्हाला माहितीये का कुशचे बाबाही लोकप्रिय अभिनेते आहेत. आणि दोन्ही बाप-लेकाने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत एकत्र कामही केलंय.

कुशच्या वडिलांचं नाव आहे हिमांशु शाह. हिमांशु यांनी 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत काही भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवलंय.

कुशचे बाबा कधी जेठालालला घाबरवणाऱ्या नर्तकाच्या भूमिकेत दिसले, तर कधी सुंदरलालच्या अहमदाबादच्या मित्राच्या भूमिकेत दिसले. एकूणच छोट्या भूमिकांमध्ये कुशच्या बाबांनी 'तारक मेहता का उलटा चष्मा' शो गाजवला.

इतकंच नव्हे 'तारक मेहता का उलटा चष्मा' शो मध्ये हिमांशु शाह अनेकदा गर्दीचा हिस्साही बनले. एकूणच अभिनयाची आवड असल्याने त्यांनी छोट्याश्या भूमिकेत का होईना 'तारक मेहता का उलटा चष्मा' मध्ये झळकत राहिले.

कुशच्या अभिनय प्रवासात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. कुशने काही वर्षांपूर्वीच शिक्षण सोडलं. पण हिमांशु यांनी कुशच्या अभिनय कारकीर्दीला कायमच प्रोत्साहन दिलं.

कुश शाह सध्या मालिकेत गोलीच्या भूमिकेत दिसत नाहीये. तरीही प्रेक्षकांच्या मनात मात्र 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील गोली म्हणून कुशच लक्षात आहे.

















