Swarda Thigale's glamrous photo on social media, see photos Tjl
मराठमोळ्या स्वरदा ठिगळेचे ग्लॅमरस फोटो पाहून म्हणाल, क्या बात है! By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:34 AM2020-03-17T10:34:14+5:302020-03-17T10:40:23+5:30Join usJoin usNext Swarda Thigale सोज्वळ सौंदर्य, भावदर्शी चेहरा यामुळं अभिनेत्री स्वरदा ठिगळेला रसिकांची पसंती मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने शिविकाची भूमिका साकारली होती. तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने सांची मिश्राची भूमिका केली होती. स्वरदा मुळची पुण्याची असून तिचा जन्म २९ ऑक्टोबर, १९९३ साली झाला आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी सिनेइंडस्ट्रीतून केली आहे. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.टॅग्स :मराठीmarathi