'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकीनं आई झाल्यानंतर केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 07:46 PM2022-09-12T19:46:14+5:302022-09-12T19:52:22+5:30

Meenakshi Rathod : अभिनेत्री मीनाक्षी राठोड सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांंना अपडेट देत असते.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तसेच या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

या मालिकेत देवकीच्या भूमिकेतून मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) घराघरात पोहचली. मात्र सध्या या मालिकेत तिच्या जागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी पाहायला मिळत आहे.

मीनाक्षी राठोडला नुकताच कन्यारत्न प्राप्त झाला आहे. त्यामुळे सध्या ती रजेवर आहे.

अभिनेत्री मीनाक्षी राठोड सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांंना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती फोटोदेखील शेअर करते.

दरम्यान, आई झाल्यानंतर पहिल्यांदाच मिनाक्षी राठोडनं ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

मिनाक्षी राठोडच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

मिनाक्षी राठोडनं तिच्या लेकीचं नाव यारा ठेवले आहे. तिचे ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते. या फोटोंना पसंती मिळताना दिसते.