Photos: कान्सच्या रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक्, म्हणाले- "लय भारी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 17:09 IST2026-05-17T17:05:31+5:302026-05-17T17:09:25+5:30

Cannes Film Festival: सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सध्या जोरदार चर्चा आहे. या फेस्टिव्हलमध्ये मराठी सेलिब्रिटीही सहभागी झाले आहेत.

सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.

या फेस्टिव्हलसाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. लाल रंगाच्या गाऊनमध्ये प्राजक्ता ग्लॅमरस दिसत होती.

केस मोकळे सोडत गळ्यात खड्यांचा दागिना घालत आणि हातात पर्स घेत प्राजक्ताने फोटोसाठी खास पोझ दिल्या.

कान्स फेस्टिव्हलमधील फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

प्राजक्ताचे हे फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "लय भारी", "सार्थ अभिमान", "छान दिसतेस" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

प्राजक्तासोबत कान्स फेस्टिव्हलमध्ये अशोक सराफ-निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर हे सेलिब्रिटीही दिसणार आहेत.