PHOTOS: मराठी मालिकेतील अभिनेते देखील आहेत मालामाल; जाणून घ्या एका एपिसोडसाठी कोण किती घेतं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:00 AM2023-01-28T07:00:00+5:302023-01-28T07:00:07+5:30

Marathi Serial: छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सध्या अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचा आवडता अभिनेता किती मानधन घेतो ते सांगणार आहोत..

मंदार जाधव : सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. यात मंदार जाधव साकारत असलेल्या जयदीपची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. जयदीपा एका भागासाठी 38 हजार रुपयांचं मानधन मिळतं.

शशांक केतकर : होणार सुन मी या घरची या मालिकेतून शशांक केतकर हे नाव घराघरात पोहोचले. शशांक सध्या मुरांबा मालिकेत अक्षयच्या भूमिकेत दिसतोय. या भूमिकेसाठी तो किती मानधन घेते माहितीये? तर एका भागासाठी ४० हजार रुपये.

चेतन वडनेरे : स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांकची भूमिका चेतन वडनेरे साकारत आहे. चेतन वडनेरे हा मराठीतील नवेदित कलाकारांपैकी एक आहे. चेतन मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 35 हजार रुपये मानधन घेतो.

श्रेयस तळपदे : छोट्या पडद्यावर सध्या माझी तुझी रेशमगाठ मालिकाने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस तळपदेने बऱ्याच वर्षांनी मराठी कलाविश्वात पदार्पण केलं होतं. श्रेयस हा छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा अभिनेता ठरला होता. एका भागासाठी तो तब्बल ४८ हजार रुपये मानधन घ्यायचा.

स्वप्निल जोशी : तू तेव्हा तशी मालिकेतून चॉकलेट बॉय स्वप्निल जोशीने छोट्या पडद्यावर कमबॅके केलं आहे. तो साकारत असलेली सौरभची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या भूमिकेसाठी स्वप्निल एका भागासाठी ४५ हजार रुपये मानधन घेतो.