मराठमोळी निर्माती श्वेता शिंदे पिवळ्या साडीत दिसली खूपच ग्लॅमरस, फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 04:52 PM2022-12-06T16:52:20+5:302022-12-06T16:58:05+5:30

Shweta shinde : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे (Shweta Shinde) हिने अभिनयातच नाहीतर निर्मिती क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे.

‘लागिर झालं जी’ मालिकेची निर्मिती श्वेता शिंदेनेच केली होती. या मालिकेला मिळालेल्या भरघोस यशानंतर 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही तिने केली.

आता श्वेता शिंदे हिने पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

श्वेता शिंदेने मॉरिशसमध्ये हे फोटोशूट केले आहे.

श्वेता शिंदेने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

इतकेच नाही तर तिने साडीत फिगरदेखील फ्लॉन्ट केली आहे.

साडीतल्या फोटोशूटमध्ये श्वेता शिंदे खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

श्वेता शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

श्वेताने ‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं.

श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'देऊळबंद', 'इश्श्य', 'यळकोट यळकोट जय मल्हार' अशा सिनेमांमध्ये श्वेता शिंदेने भूमिका साकारल्या होत्या.