PHOTOS : ‘अग्गंबाई सूनबाई’ फेम अभिनेत्रीचं गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 04:20 PM2022-08-26T16:20:32+5:302022-08-26T16:26:53+5:30

Uma Pendharkar : लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आता मराठमोळी अभिनेत्री उमा पेंढारकर हिने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे...

लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आता मराठमोळी अभिनेत्री उमा पेंढारकर हिने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

होय, ‘अग्गंबाई सूनबाई’ ने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहे. या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली होती.

‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. हीच उमा आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त केलेल्या खास फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात उमा कमालीची सुंदर दिसतेय.

जांभळ्या रंगाची साडी, त्यावर साजेसे दागिने असा तिचा मराठमोळा लुक आहे. सोबत लाडके बाप्पा आहेतच.

या फोटोत उमाने बाप्पाच्या मूर्तीसोबत वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. काही फोटोत ती वीणा वाजवताना दिसतेय.

उमाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काळजाला भिडणारं हास्य, सुंदर, अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत.

अभिनेत्री उमा पेंढारकर हिचे पूर्ण नाव उमा ऋषिकेश पेंढारकर असं आहे. डोंबिवलीकर असलेल्या उमा पेंढारकर हिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण हे रामनारायण रुईया महाविद्यालयातून पूर्ण केलं.

तिने सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचे कामही मोठया जबाबदारीने करते. ती उत्तम नृत्यांगणाही आहे.