साध्या ड्रेसमध्येही सुंदर दिसते 'लागीरं झालं जी'ची शितली; सिंपल लूकमध्ये जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 06:12 PM2022-07-07T18:12:02+5:302022-07-07T18:16:27+5:30

Shivani baokar: या मालिकेनंतर शिवानीने कुसूम या मालिकेतही काम केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवर चर्चा रंगत असते.

'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.

या मालिकेत शितल पवार अर्थात शितली ही भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवलं.

या मालिकेनंतर शिवानीने कुसूम या मालिकेतही काम केलं. त्यामुळे सोशल मीडियावर तिची वरचेवर चर्चा रंगत असते.

शिवानी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून वरचेवर ती चाहत्यांच्या भेटीला येत असते.

अलिकडेच शिवानीने छानसं फोटोशूट केलं आहे. यातील काही निवड फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले.

या फोटोमध्ये शिवानी अत्यंत साध्या लूकमध्ये दिसत आहे. मात्र, या लूकमध्येही ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

शिवानीच्या या फोटोला विशेष पसंती मिळत आहे.