बालीमध्ये सईचा कूल लूक; हटके फोटो शेअर करत दाखवला ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:47 PM2022-08-02T16:47:36+5:302022-08-02T16:51:17+5:30

Sai lokur: सईने आतापर्यंत या ट्रीपमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन ती दररोज नवनवीन ठिकाणांना भेट देत असल्याचं पाहायला मिळतं.

बिग बॉस मराठीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.

घरात टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे सई विशेष चर्चेत आली. मात्र, सध्या तिचा कलाविश्वातील वावर कमी झाल्याचं पाहायला मिळतो.

सई कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरीदेखील सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे.

सध्या सई तिच्या कुटुंबियांसोबत बाली ट्रिप एन्जॉय करत असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

सईने आतापर्यंत या ट्रीपमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन ती दररोज नवनवीन ठिकाणांना भेट देत असल्याचं पाहायला मिळतं.

या ट्रीपमध्येही सईचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

सईच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.

या ट्रीपमध्ये सई तिच्या नवऱ्याशिवाय गेल्याचं पाहायला मिळतं. एका पोस्टमध्येही तिने नवऱ्याला मिस करत असल्याचं म्हटलं आहे.