'कबीर सिंग'नंतर हिंदीत फक्त कामवालीचीच भूमिका ऑफर होते; वनिता खरातची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 04:05 PM2023-08-01T16:05:27+5:302023-08-01T16:09:21+5:30

Vanita kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांना हसवणाऱ्या वनिताने शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' या सिनेमातही काम केलं आहे.

लोकप्रिय अभिनेत्री, कॉमेडियन म्हणजे वनिता खरात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून वनिता प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.

वनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याविषयी व्यक्त होत असते.

काही महिन्यांपूर्वीच वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांचा लग्नसोहळा बराच काळ चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलं.

वनिताने नाटक,एकांकिका यांपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. या काळात तिने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांना हसवणाऱ्या वनिताने शाहिद कपूरच्या कबीर सिंग या सिनेमातही काम केलं आहे.

कबीर सिंगमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्येही वनिताने तिची जागा निर्माण केली. या भूमिकेने तिला बरंच काही दिलं. मात्र, ही भूमिका केल्यानंतरही ती काही अंशी नाराज आहे.

अलिकडेच वनिताने स्वराज या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिची खंत व्यक्त केली.

कबीर सिंगनंतर सातत्याने मला बॉलिवूडमध्ये घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका ऑफर होते असं तिने सांगत तिने खंत व्यक्त केली.

"बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा रोल केला की मग कायम त्यासारख्या रोलसाठीच विचारणा होते. हेच मला नाही आवडत. तो व्यक्ती कलाकार आहे त्यामुळे तो काही ठराविक साच्यातलं काम करत नाही.तो वेगवेगळी काम करु शकतो. त्यामुळे त्याच्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे," असं वनिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी आता 'कबीर सिंग'मध्ये घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका केली. आता हिंदीमधल्या सगळ्याच कास्टिंग एजन्सी मला ओळखतात. त्यांच्याकडे माझं प्रोफाइल आहे. पण, ते लोक फक्त मला मेड च्या भूमिकेसाठीच बोलावतात."

दरम्यान, "त्यांच्या ऑफर्स ऐकून असं होतं की आता मी हे केलं की मग हेच आता पुढे किती वेळा करणार. त्यामुळे मला वेगवेगळ्या भूमिका करुन स्वत:ला चाचपडून पाहायचं आहे."