जितकी सोज्वळ तितकीच ग्लॅमरस आहे लागिरं झालं जी फेम शीतली, SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:20 PM2022-01-11T15:20:23+5:302022-01-11T15:29:34+5:30

छोट्या पडद्यावरील लागीर झालं जी (Lagira Zhala Ji )ही मालिका रसिकांना प्रचंड भावली होती. या मालिकेत अजिंक्यच्या फौजी बनण्यासाठीची धडपड, त्याची प्रेमकहानी आणि त्याच्या मार्गात येणारे अडथळे मोठ्या खुबीने रंगवण्यात आले होते.अजिंक्यसोबतच या मालिकेतील शीतल, राहुल्या, जयडी, भैय्या, टॅलेंट अशी प्रत्येक पात्रं रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.

बोलण्यात पटाईत, तितकीच तेज आणि समोरच्या व्यक्तीची बोलती बंद करणारी शीतल याच मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झाली होती.

अभिनेत्री शिवानी बावकरने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती.

तिच्या अभिनयामुळेच अज्याला गुडलक देणारी शीतल रसिकांच्या काळजात घर करुन गेली होती.

विशेष म्हणजे ऑनस्क्रीन शीतल अभ्यासात ढ दाखवण्यात आली होती.

रिअलमध्ये मात्र शीतल म्हणजेच शिवानी बावकर अभ्यासात भलतीच हुशार आहे.

अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे.

ऑनस्क्री ती जितकी सोज्वळ दाखवण्यात आली होती. रिअलमध्ये ती तितकीच स्टायलिश आहे.

सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिच्या विविध अदा पाहायला मिळतील.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

एरव्ही पारंपिरक ड्रेसमध्ये दिसणारी शीतली मॉर्डन अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसते.

पारंपरिक असो वा मॉडर्न तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.