'जीव झाला येडा पिसा' फेम सोनी करतेय 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला डेट, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 04:15 PM2022-07-12T16:15:09+5:302022-07-12T16:27:30+5:30

जीव झाला येडा पिसा फेम सोनीने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची जाहिरपणे कबुली दिली आहे.

जीव झाला येडा पिसा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. (Photo Instagram)

मालिकेत शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग (sharvari jog)हिने साकारली होती.(Photo Instagram)

शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची आहे. शाळेत असल्यापासूनच शर्वरी बालनाट्यातून काम करत होती. तिचे वडील नाट्य क्षेत्राशी निगडित होते. त्यामुळे तिला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती. मालिकेत येण्याअगोदर शर्वरीने प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकांमधून काम केले आहे.(Photo Instagram)

बीएससीची पदवी मिळवलेल्या शर्वरीला पेंटिंगची आवड होती त्यासाठी कला निकेतनमधून तिने फाईन आर्टस् चे शिक्षण घेतले आहे. जीव झाला वेडा पिसा या मालिकेतील सोनीच्या भूमिकेने शर्वरीला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. (Photo Instagram)

विधिलिखित या वेबसिरीजमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली. सध्या सन मराठी वाहिनीवरील जाऊ नको दूर…बाबा या मालिकेतून ती अर्पिताच्या बहिणीची भूमिका निभावत आहे.(Photo Instagram)

शर्वरी जोग अभिनेता गौरव मालणकर (gaurav malankar )सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अनेकवेळा दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram)

गौरव मालणकर हा इंजिनिअरिंग शिकत असताना युथ फेस्टिव्हलमध्ये एकांकिका करण्यासाठी सहभागी झाला. मात्र पुढेही थिएटर करायची इच्छा व्यक्त केली होती. (Photo Instagram)

गौरव मालणकर हा नाट्य तसेच मालिका अभिनेता आहे. झी युवा वरील फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत त्याने काम केले होते. (Photo Instagram)

फुलपाखरू ही त्याची पहिली मालिका आहे.त्यानंतर तू माझा सांगाती, साईबाबा श्रद्धा आणि सबुरी, दहा बाय दहा, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा मालिका, चित्रपट आणि व्यावसायिक नाटकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला.(Photo Instagram)