चंद्रविलासच्या नानांचा रिअल लाइफ लेक आहे अभिनेता; 'ठरलं तर मग' मालिकेत करतोय करतोय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:17 PM2023-04-21T12:17:37+5:302023-04-21T12:23:25+5:30

Dhananjay sardeshpande son:चैतन्य अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखकही आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर चंद्रविलास ही नवीन मालिका सुरु झाली आहे.

हॉरर जॉनर असलेल्या मालिकेत वैभव मांगले नरहरी पंत ही भूमिका साकारत आहे.

वैभव मांगलेसह या मालिकेत सागर देशमुख, आभा बोडस, पूजा ठोंबरे, भक्ती देसाई आणि धनंजय सरदेशपांडे हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.

मालिकेतील प्रत्येक कलाकाराने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली असून आज मालिकेतील नानांविषयी जाणून घेऊयात.

२०० वर्ष जुन्या या वाड्यात नरहरी पंतांचं भूत नानांना त्रास देत आहे. त्यामुळे नानांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे.

या मालिकेमध्ये अभिनेता धनंजय सरदेशपांडे यांनी नानांची म्हणजेच अनंत महाजनच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

धनंजय सरदेशपांडे मराठीतील दिग्गज अभिनेता असून त्यांनी भाडिपासोबत काम केलं आहे.

धनजंय सरदेशपांडे यांनी अनेक गाजलेल्या मालिका, नाटकांमध्येही काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांचा लेकदेखील अभिनेता आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत धनजंय यांच्या लेकाने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

चैतन्य सरदेशपांडे असं त्यांच्या मुलाचं नाव असून तो ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याने अर्जुनच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारली आहे.

चैतन्य अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखकही आहे.

'दुरुस्त', 'घेमाडपंथी' या चित्रपटांची पटकथा त्याने लिहिल्या आहेत.

'सवित्रीजोति', 'अलटी पलटी सुमडीत कल्टी', 'दुनियादारी फिल्मी स्टाइल' या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे.