'Bigg boss marathi' फेम अभिनेत्रीची थाटात पार पडली पहिली मंगळागौरी; पाहा काही निवडक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:27 AM2022-08-22T11:27:53+5:302022-08-22T11:32:44+5:30

Sai lokur: सईने मोठ्या उत्साहात तिची पहिली मंगळागौर साजरी केली.

बिग बॉस मराठी १च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.

काही गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेल्या सईला बिग बॉसमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

सई सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतीच तिची पहिली मंगळागौर पार पडली.

या मंगळागौरीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सईने तिच्या पहिल्या मंगळागौरीचे काही निवड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सईच्या पहिल्या मंगळागौरीला तिची बेस्ट फ्रेंड आणि बिग बॉस मराठी १ ची विजेती मेघा धाडेदेखील आली होती.

पारंपरिक शास्त्रशुद्ध पद्धतीने सईने मंगळागौरीची पूजा केली.

सईच्या पहिल्या मंगळागौरीला बऱ्याच वशेळ्या (सईसोबत मंगळागौरीची पूजा करणाऱ्या मुली) आल्याचं पाहायला मिळालं.

सईने नवऱ्यासोबत शेअर केलेला फोटो