अभिनयासह राजकारणातही अव्वल! 'बिग बॉस' गाजवणाऱ्या दीपाली सय्यदच्या पती अन् मुलाला पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:58 IST2026-02-16T16:49:57+5:302026-02-16T16:58:56+5:30

मराठीतली ब्यूटी क्वीन राजकारणातही सरस!बिग बॉस गाजवणाऱ्या दीपाली सय्यदच्या पती अन् मुलाला पाहिलंत का?

अभिनेत्री दीपाली सय्यद हे मराठी सिनेविश्वातील नावाजलेलं नाव. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी ही नायिका,नृत्यांगना सध्या चर्चेत आहे.

अभिनय ते राजकारण असा यशस्वी प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात....

दीपाली सय्यद उत्तम राजकारणी, अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरदेखील आहेत. दीपाली सय्यद यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीला बंदिनी, समांतर या मालिकेत काम केलंय. तिने 'करायला गेलो एक',' लाडी गोडी', 'होऊन जाऊ दे', 'मला एक चानस हवा', 'ढोलकीच्या तालावर', 'उचला रे उचला' व 'मुंबईचा डब्बेवाला' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर दीपाली सय्यद यांच्या पतीची आणि मुलाची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांचा पती आणि मुलगा कोण आणि ते काय करतात ते जाणून घेऊयात.

मराठी इंडस्ट्रीत सक्रिय असतानाच दीपाली सय्यद यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

दीपाली सय्यदने २०१४ मध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षातर्फे राजकारणात एन्ट्री घेतली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. सध्या त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत.

दीपाली सय्यदने २००८ साली बॉबी खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली. दिपाली आणि बॉबी यांनी एक मुलगादेखील असून त्याचं नाव अली आहे.

दीपाली बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांचे पती आणि लेकासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करताना पाहायला मिळतात. अली विदेशात शिक्षण पूर्ण करत आहे. तो फोटोग्राफी करतो. फोटोग्राफीची त्याला आवड असून त्याने अनेक दिग्गजांनी फोटोग्राफी देखील केली आहे.