Bhagya Dile Tu Malal :'नऊवारी साडी, नाकात नथ' पाहा राजच्या कावेरीचा पारंपारिक थाट, पाहा लग्नातील Inside Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 04:38 PM2023-02-24T16:38:39+5:302023-02-24T17:37:39+5:30

नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. पाहा कावेरी आणि राजच्या लग्नातील Inside photo

लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात... जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या राज आणि कावेरीच्या आयुष्यात आला आहे.

ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात राज आणि कावेरीचं लग्न होणार आहे.

एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकेमकांना समोर आले आंणि दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलत गेले.

कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळ, कधी दुरावा… एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत आता तो शुभ दिवस आला आहे.

राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे.

नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे.

दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे.

सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पर पडणार आहेत. खऱ्या अर्थाने राजला कावेरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे.

"रत्नमालासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवसाची वाट ती कुठेतरी बघत होती. कारण कावेरीच्या आयुष्यात येण्याने राजमध्ये खूप बदल झाले आहेत.