निखळ सौदर्यांची खाण श्रीलीलाचं साडीत खुललं रूप, फोटो पाहून चाहते सैराट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 06:28 PM2024-03-27T18:28:43+5:302024-03-27T18:36:37+5:30

साऊथची अभिनेत्री श्रीलीला सध्या चर्चेत आहे.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला हिने आपल्या दिलखेच अदांनी खळबळ उडवून दिली आहे.

श्रीलीला ही साऊथच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत वर्चस्व गाजवत आहे.

श्रीलीलाने रश्मिका मंदान्ना सारख्या टॉप अभिनेत्रींची जागा घेतली आहे.

बॅक टू बॅक हिट चित्रपट दिल्यानंतर श्रीलीला दक्षिण सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे.

श्रीलीला फक्त 22 वर्षांची असून, तिचे हे यश डोळे दिपवणारे आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय असून आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच श्रीलीलानं साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एकापेक्षा एक पोज देत आपल्या नजरेनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

अमेरिकेत जन्मलेली श्रीलीला ही बंगळुरू येथील एका प्रख्यात उद्योगपतीची मुलगी आहे.

नुकतेच महेश बाबू आणि श्रीलीला यांचा गुंटूर कारम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला बॉक्स ऑफिसवर चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

२२ वर्षीय श्रीलीलाचा कुरुची मधापेट्टी नावाच्या गाण्यावर केलेला डान्स लोकप्रिय होताना दिसतो आहे. ती आता तिच्या डान्समुळे लोकप्रिय झालेली दिसत आहे.