पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं होतं जीवन, मोलकरणीच्या नावावर केली कोटींची मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:21 IST2025-10-20T16:58:23+5:302025-10-20T17:21:24+5:30

विविध सिनेमात खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखद कहाणी, जी वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

झगमगाटाच्या दुनियेत काही कलाकारांचे आयुष्य पडद्यामागे खूपच वेदनादायक असते. हा किस्सा अशाच एका अभिनेत्याचा. जो पत्नीच्या निधनानंतर पूर्ण खचून गेला होता.

या अभिनेत्याचं नाव आहे तिरुमला सुंदर रंगनाथ. साउथ इंडस्ट्रीत विविध सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून रंगनाथ यांची ओळख होती.

१९४६ साली जन्मलेल्या रंगनाथ यांनी १९६९ मध्ये 'बुद्धिमनथुडू' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे विविध सिनेमांमधून त्यांनी भूमिका गाजवल्या.

२००९ मध्ये दीर्घकाळ आजारी असलेल्या रंगनाथ यांच्या पत्नी चैतन्य यांचं निधन झालं. पत्नीच्या निधनाने रंगनाथ पूर्णपणे हादरले आणि ते नैराश्यात गेले.

नैराश्यात गेलेल्या रंगनाथ यांनी २०१५ मध्ये त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. पोलिसांना त्यांच्या घरी एक सुसाइड नोट सापडली.

अभिनेते रंगनाथ यांनी आपली सर्व मालमत्ता त्यांच्या घरी बऱ्याच काळापासून घरकाम करत असलेली मोलकरीण मीनाक्षीच्या नावावर केली होती.

"मीनाक्षी आमच्या घरी काम करत होती. तिने माझ्या आई-वडिलांची त्यांच्या शेवटच्या काळात खूप काळजी घेतली. म्हणूनच वडिलांनी तिच्या नावावर संपत्ती केली.'', असा खुलासा रंगनाथ यांच्या मुलीने केला होता.