मुस्कुराहट है हुस्न का जेवर, मुस्कुराना न भूल जाया करो...अप्पूच्या इंडोवेस्टर्न लूकवरून नजर हटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 04:03 PM2024-03-16T16:03:25+5:302024-03-16T16:13:01+5:30

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका म्हणून ‘ठिपक्यांची रांगोळी’ ओळखली जाते. या मालिकेतील अप्पू आणि शशांकच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर उचलून घेतलं होतं. या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साकारलेली अप्पूची भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली.

स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसारित होणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आजही प्रेक्षकांमध्ये या मालिकेची क्रेझ पाहायला मिळते.

या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली.

नुकतेच ज्ञानदा रामतीर्थकरने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोमध्ये ती हिरव्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. या इंडोवेस्टर्न लूकमध्ये ज्ञानदा फारच सुंदर दिसतेय.

या फोटोला तिनं Cute & Sizzling… All At Once! असं कॅप्शन दिलं आहे. ज्ञानदानं शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

'Wow अप्पू किती भारी दिसते तु' अशी कमेंट ज्ञानदानं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं दिली आहे. फोटोंमधील ज्ञानदाचा बोल्ड आणि हटके अंदाज चाहत्यांना भलताच भावलाय.