शिपायाची लेक झाली नागराजची हिरोईन; 'बापल्योक'च्या पायलची स्ट्रगल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 02:03 PM2023-08-16T14:03:36+5:302023-08-16T14:07:56+5:30

Payal jadhav: नागराज मंजुळे कायम रॉ टॅलेंटचा शोध घेऊन गावखेड्यातील कलाकारांना सिनेमात संधी देत असतात. अशीच संधी त्यांनी बापल्योकच्या पायलला दिली आहे.

नागराज मंजुळे यांचा बापल्योक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून वडील आणि मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.

सध्या हा सिनेमा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. यामध्येच सध्या त्यातील अभिनेत्री पायल जाधव हिची चर्चा रंगली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नागराज यांनी पुन्हा एका नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.

नागराज मंजुळे कायम रॉ टॅलेंटचा शोध घेऊन गावखेड्यातील कलाकारांना सिनेमात संधी देत असतात. अशीच संधी त्यांनी बापल्योकच्या पायलला दिली आहे.

पायल एका शिपायाची लेक असून तिचा हा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीमध्ये तिने तिची संघर्ष काहानी सांगितली आहे.

पायलचे वडील मूळचे शेतकरी परंतु, गावात पाण्याचा दुर्भिक्ष्यामुळे त्यांनी गाव सोडलं आणि ते पुण्यात आले.

पायलचे वडील पुण्यात आल्यानंतर त्यांनी सरस्वती विद्यामंदिरमध्ये शिपाई म्हणून काम केलं. याच शाळेत पायलने तिचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ सायन्समधून पदवी घेतली.

पायलने ललित कला केंद्रामध्ये मास्टर्स इन भरतनाट्य केलं आहे. बापल्योकच्या माध्यमातून ती कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे हा सिनेमा तिच्यासाठी स्पेशल असल्याचं म्हटलं आहे.

पायल सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

नागराज मंजुळे निर्मित आणि मकरंद माने दिग्दर्शित बापल्योक सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.