नटरंगी नार! अबोली रंगाच्या पैठणीत खुललं सोनालीचं सौंदर्य; पारंपरिक लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 04:12 PM2024-03-04T16:12:58+5:302024-03-04T16:19:20+5:30

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची नायिका आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या अंदाजासाठी चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावर सोनालीचा तगडा चाहतावर्गही पाहायला मिळतो.

मराठी मनोरंजन विश्वातील अप्सरा अशी सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्याने, नृत्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. घाऱ्या डोळ्यांची ही अप्सरा अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीवर राज्य करत आहे.

मराठी, हिंदीनंतर सोनालीने नुकतंच मल्याळम सिनेमातही पदार्पण केलं आहे. तिला थेट सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

सध्या सर्वत्र सोनालीचं कौतुक होत आहे. सोनालीने तमिळ सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. नटरंग, हिरकणी, मितवा या मराठी चित्रपटांमध्ये सोनाली झळकली होती. तिचा हिरकणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या सिनेमात सोनालीने दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

अलिकडेच तिनं केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. अबोली रंगाच्या साडीमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसतेय. तिच्या रुपाची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

नाकात नथ, गळ्यात मोत्यांचा हार तसेच कपाळावर चंद्रकोर असा मराठमोळा रॉयल लूक तिनं केलाय. नेटकऱ्यांनी सोनालीच्या व्हायरल फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सची उधळण केली आहे.