PHOTOS : एवढं भारी कुणी दिसतं का? सईच्या हटके लुकवर चाहते फिदा, 'फिल्मफेअर'वरही तिचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:08 AM2022-08-31T11:08:41+5:302022-08-31T11:15:22+5:30

Sai Tamhankar : सई ताम्हणकर तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाते. इव्हेंट कुठलाही असो सर्वांमध्ये सईचे आउटफिट, तिचा लुक नेहमीच उठून दिसले आहेत. मग फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सईच्या लुकची चर्चा तर होणारच...

सई ताम्हणकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड, ग्लॅमरस अभिनेत्री. आता तर बॉलिवूडमध्येही तिचा बोलबाला आहे. सध्या तिचीच चर्चा आहे.

सईने यंदाचा फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरलं आहे. आयफा अवार्ड जिंकल्यानंतर आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यंदाच्या फिल्मफेअरमध्ये सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. ‘मिमी’ या सिनेमासाठी तिला हा पुरस्कार मिळाला.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील सईचा हटके लुकही चर्चेत राहिला. तिच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

तशीही सई ताम्हणकर तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाते. इव्हेंट कुठलाही असो सर्वांमध्ये सईचे आउटफिट, तिचा लुक नेहमीच उठून दिसले आहेत. मग फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सईच्या लुकची चर्चा तर होणारच.

सईने यावेळी निकिता टंडन या फॅशन डिझायनरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. यावरची तिची हेअरस्टाईल हटके होती.

या ड्रेसमध्ये सईने झक्कास पोझ दिल्यात. त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आता काय मी वाचत नाही भाऊ, एवढं भारी कुणी दिसतं का? अशी एका चाहत्याची कमेंट लक्षवेधी ठरली.

कुणी शब्द देता का शब्द... कारण माझ्याकडे नाहीत, असं एका चाहत्याने लिहिलं. सईचा लुक पाहून या चाहत्याला जणू शब्द सुचेनात...