मायलेकीची जोडी आहेच खास! किशोरी गोडबोलेंच्या मुलीला पाहिलंय का? 'मल्टिटॅलेंटेड' आहे सई...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 05:49 PM2024-03-16T17:49:57+5:302024-03-16T18:17:27+5:30

सौंदर्य आणि तिचं हास्य सगळंच आईसारखं आहे. सई गोडबोले कशाकशात हुशार आहे माहितीये का?

मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले (Kishori Godbole) सध्या कलाविश्वापासून दूर आहेत. 'अधुरी एक कहाणी' मालिकेत स्वप्नील जोशीसोबत त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. सध्या त्या हिंदीतही काम करत आहेत.

मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले (Kishori Godbole) सध्या कलाविश्वापासून दूर आहेत. 'अधुरी एक कहाणी' मालिकेत स्वप्नील जोशीसोबत त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. सध्या त्या हिंदीतही काम करत आहेत.

किशोरी गोडबोले यांच्यासारखंच सौंदर्य, हास्य हे त्यांच्या मुलीमध्येही उतरलं आहे. सई गोडबोले (Sai Godbole) ही त्यांची लेक आहे जी दिसायला आईसारखीच सुंदर आहे.

सई सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनच ती नक्की काय करते आणि किती टॅलेंटेड आहे याचा अंदाज येतो.

सई परदेशात ग्रॅज्युएट झाली असून मल्टिटॅलेंटेड आहे. तिला विविध भाषांमध्ये त्याच स्टाईलने उच्चार करत बोलायला आवडतं. शिवाय ती उत्तम गाणं गाते. इतकंच नाही तर आईसारखीच उत्कृष्ट डान्सरही आहे. सईला एक से एक कला अवगत आहेत.

२०२१ साली सईने जाहिरातीत काम केलं होतं. यानंतर ती मराठी सिनेसृष्टीत येत अभिनयात काम करेल असा अंदाज होता. पण सईला इतरही अनेक आवडीनिवडी असल्याने सध्या ती गाण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसतं.

सईला वेगवेगळ्या भाषेत बोलायला येतं तसंच गायलाही येतं. तिच्या फ्युजन गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. कोरोना काळात तिचं टॅलेंट सर्वांपर्यंत पोहोचलं.

सई स्वत: उत्तम लिखाणही करते. लवकरच ती अभिनयातही सक्रीय होईल यात शंका नाही. आपल्या मल्टीटॅलेंटेड लेकीचा किशोरी गोडबोलेंना खूप अभिमान आहे.