Photos: माय तशी लेक! आईच्या पावलावर पाऊल, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेकही आहे अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:56 IST2026-05-06T16:50:08+5:302026-05-06T16:56:14+5:30
फोटोत दिसणाऱ्या या मायलेकी कोण आहेत? तुम्ही त्यांना ओळखलं का?

या फोटोमध्ये मराठीतील दोन प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. फोटोतील या मायलेकी आज मराठी सिनेसृष्टी गाजवत आहेत.

पण फोटोत दिसणाऱ्या या मायलेकी कोण आहेत? तुम्ही त्यांना ओळखलं का?

फोटोत दिसणारी चिमुकली जुई भागवत आणि तिची आई दिप्ती भागवत आहेत.

अभिनेत्री जुईने आईबाबांच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.

दिप्ती भागवत हा मराठी सिनेइंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. त्या केवळ अभिनेत्री नाही तर उत्कृष्ट सूत्रसंचालिका, निवेदिका, गायिका तसेच गीतकार आहेत.

संगीतकार, गायक मकरंद भागवत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. अनेक नाटक आणि सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे.

आईप्रमाणेच जुईनेही अभिनयात पाऊल ठेवलं आहे. बालकलाकार म्हणूनच तिने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती.

'लाइक आणि सबस्क्राइब' या सिनेमातून जुईने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर केदार शिंदेंच्या 'झापुक झुपूक' सिनेमातही जुई दिसली होती.

'गुलकंद' सिनेमातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली. जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
















