PHOTOS : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेची बायकोसाठी खास पोस्ट, पाहा कपलच्या वेडिंगचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 01:45 PM2022-07-12T13:45:22+5:302022-07-12T13:53:09+5:30

Subodh Bhave Manjiri Bhave Wedding Anniversary : सुबोध भावे हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता. आज सुबोधच्या लग्नाचा 21 वा वाढदिवस. लग्नाच्या वाढदिवशी सुबोधने पत्नी मंजिरीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सुबोध भावे हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता. आज सुबोधच्या लग्नाचा 21 वा वाढदिवस. लग्नाच्या वाढदिवशी सुबोधने पत्नी मंजिरीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

लग्नाच्या 21 व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मंज्या..., असं लिहित सुबोनं मंजिरीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत एक खास फोटोही शेअर केला आहे.

आज आम्ही सुबोध व मंजिरीच्या लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त या कपलच्या लग्नाचे काही फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सुबोध व मंजिरीची लव्हस्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे.

त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तो क्लीन बोल्ड झाला. तिला पाहताच त्याच्या ‘दिल की घंटी बजने लगी’ अशी त्यांची लव्हस्टोरी.

दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. तो मंजिरीवर असा काही फिदा झाला होता की, तिचा क्षणभराचा विरह सुद्धा त्याला सोसवेना.

त्यानंतर त्याने मंजिरीला प्रपोज करण्याचं ठरवलं आणि अखेर तो दिवस आला. सुबोधनं मंजिरीला प्रपोज केलं. विशेष म्हणजे, सुबोधने प्रपोज केल्यावर मंजिरीनेही तितक्याच हटके अंदाजात त्याला उत्तर दिलं. एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं होतं.

‘बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज..’, असं मंजिरी त्यावेळी सुबोधला म्हणाली. मग काय, सुबोध त्या पुलावर कधीच पोहोचला होता. मंजिरी येणार की नाही, हाच विचार सुरू असताना, बरोबर ठरल्या वेळी मंजिरी पुलावर सुबोधला भेटायला आली आणि लव्हस्टोरीची सुरूवात झाली.

1991 मध्ये सुबोध व मंजिरीची लव्हस्टोरी सुरू झाली. 2001 साली दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. या लग्नाला यंदा 21 वर्षे पूर्ण झाली आहेत.

लग्नबंधनात अडकण्यापूर्वी मंजिरी आणि सुबोध दोघांनी जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर कुटुंबाच्या सहमतीने दोघांनीही लग्न केलं. लग्नाच्या 21 वर्षांनंतरही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.

मंजिरी खंबीरपणे सुबोधच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते. दोघांना मल्हार आणि कान्हा अशी दोन मुलं आहेत.