​'आयत्या घरात घरोबा'मधील कानन आता दिसते अशी, लंडनमध्ये करतेय मराठी सिनेमाचं शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:00 AM2022-06-21T07:00:00+5:302022-06-21T07:00:12+5:30

'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba Movie) ​या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नायिकेची म्हणजेच काननची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालं आहे.

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba Movie) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. ​या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नायिकेची भूमिका निभावणारी अभिनेत्री राजेश्वरी सचदेव(Rajeshwari Sachdev)ला आता ओळखणं कठीण झालं आहे.

आयत्या घरात घरोबा या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात काननची भूमिका साकारली होती अभिनेत्री राजेश्वरी सचदेव(Rajeshwari Sachdev)ने.

राजेश्वरी सचदेव ही थिएटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना म्हणूनही ओळखली ​जाते. मुंबईत एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या राजश्रीने IPTA​ जॉईन केले​, ​अनेक नाटकांतून तिने ​अष्टपैलू भूमिका साकारल्या.

आयत्या घरात घरोबा हा तिने साकारलेला पहिला वहिला मराठी चित्रपट होता. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी सुरज का सांतवा घोडा चित्रपटात तिला काम दिले. सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून तिला संधी मिळाली.

हुल्ले हुल्लारे… हे तिने गायलेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. राजश्रीला खरी ओळख मिळाली ती झी टीव्ही वरील अंताक्षरीच्या शोमुळे. या शोचे सूत्रसंचालन राजेश्वरी आणि अनु कपूर यांनी केले होते. याच शोमुळे तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार देखील मिळाला होता.

अभिनेता वरूण वडोला याने अंतक्षरीच्या शोमध्ये ​सहभाग घेतला होता. तिथेच राजेश्वरीशी त्याची चांगली ओळख झाली. वरुण वडोला हा हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. २००४ साली राजेश्वरी वरूण सोबत विवाहबद्ध झाली. त्यांना देवाज्ञ नावाचा एकुलता एक मुलगा आहे.

२०१८ साली राजेश्वरी पुन्हा एकदा मराठी सिनेइंडस्ट्रीकडे वळली. एक सांगायचंय या मराठी चित्रपटात तिने काम केले. यात तिच्यासोबत के के मेनन आणि राजेश्वरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले होते.

आता पुन्हा एकदा राजेश्वरी मराठी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे माय डॅड्स वेडिंग. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते करत आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. या चित्रपटात राजेश्वरीशिवाय पूजा सावंत, अजिंक्य देव आणि सई गोडबोले हे कलाकार पाहायला मिळणार आहे.