मराठमोळ्या नेहा महाजनच्या बॉयफ्रेंडला पाहिलंत का?, अभिनेत्रीनं शेअर केली रोमँटिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 01:36 PM2022-09-24T13:36:10+5:302022-09-24T13:40:21+5:30

Neha Mahajan : नेहा महाजन हिने नुकतेच बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

कलाकारांच्या प्रोफेशनलसोबत खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तसेच कलाकारदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात.

अभिनेत्री नेहा महाजन हिने व्हॅलेंटाइन डेला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रेमाची कबुली दिली होती.

त्यानंतर आता पुन्हा तिने इंस्टाग्रामवर रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

नेहा महाजनच्या बॉयफ्रेंडचं नाव ब्रॅडली ड्युन्स आहे.

नेहाने इंस्टाग्रामवर नुकताच त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी विकेंड लव्हर.

या फोटोत नेहा महाजन आणि ब्रॅडली लिफ्टमध्ये दिसत आहे आणि ब्रॅडली तिच्या कपाळावर किस करताना दिसतो आहे.

त्यांच्या या रोमँटिक फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अभिनेत्री नेहा महाजनने 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी चित्रपटात काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

'जीबून संदेश' या आोरिया फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत. 'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

ती रणवीर सिंगच्या सिंबा चित्रपटातही झळकली आहे.

'बाबू' या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन यांच्यासोबत रुचिरा जाधवही दिसणार आहे.