सूर्यास्ताच्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली अप्सरा; राजस्थानमध्ये केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 08:00 AM2023-04-08T08:00:00+5:302023-04-08T08:00:00+5:30

Sonalee kulkarni: सोनालीने राजस्थानमधील किल्ल्यावर हे फोटोशूट केलं आहे.

अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

'नटरंग' सिनेमातील अप्सरा आली या गाण्यामुळे सोनाली विशेष लोकप्रिय झाली.

सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अलिकडेच सोनालीने एक फोटोशूट केलं.

सोनालीने सूर्यास्ताच्या वेळी हे फोटोशूट केलं आहे.

सोनालीने राजस्थानमधील पोखरण येथील किल्ल्यावर हे फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये सोनालीने फ्लोरल प्रिंट असलेला वनपीस परिधान केला आहे.

सोनाली या फोटोमध्ये प्रचंड सुंदर दिसत असून तिने पाठीवर मोकळे सोडलेले केस या फोटोंची शोभा आणखी वाढवत आहेत.

सोनालीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.