Cannes 2024: कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:08 PM2024-05-23T14:08:42+5:302024-05-23T14:46:56+5:30

अभिनेत्री आदिती राव हैदरीने Cannes 2024 मध्ये आपल्या सौंदर्याची जादू पसरली.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 ला दिमाखात सुरुवात झाली आहे. यंदा भारतीय अभिनेत्रींच्या फॅशन आणि लुक्सकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली.

तिने फेस्टिव्हलमधील अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एका अनोख्या अवतारात दिसत आहे.

अदिती राव हैदरीनं तिच्या लूकसाठी पिवळ्या आणि काळ्या रंगसंगतीच्या फ्लोरस ड्रेसची निवड केली. यासोबत तिनेगोल्डन कानातले आणि मेसी हेअर बन केला होता.

कान फिल्म फेस्टिव्हल'मध्ये दिसला अदितीचा सुपर ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले.

आदितीच्या फोटोवर होणारा पती सिद्धार्थही फिदा झाला आहे. अदितीच्या लूकवर सिद्धार्थने 'Oh wow!' अशी कमेंट केली.

गौरी आणि नैनिका यांनी अदितीचा हा खास ड्रेस डिझाइन केला. या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं. तिचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये अदिती समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. आदिती राव हैदरी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या सौंदर्य आणि एलिगेंससमोर कोणी टिकू शकत नाही.

आदिती इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरून नजर हटवणे कठीणच. आदितीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू झाला आहे. हे 24 मे पर्यंत सुरू राहणार आहे.

अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने साकारलेल्या 'बिब्बोजान' भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.