वय वर्ष फक्त अठरा, पण भल्याभल्या अभिनेत्रींसाठी ठरतेय 'खतरा'... पाहा रिवाचे Bold फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:45 AM2024-04-03T10:45:13+5:302024-04-03T11:15:52+5:30

Riva Arora Bold Photos: रिवा वयाच्या मानाने मोठी दिसते यावरून बरेचदा चर्चा होतात. पण त्याकडे लक्ष न देता ती मात्र चाहत्यांसाठी नवनवे फोटोशूट करत असते.

Riva Arora Bold Photos: चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या सोशल मीडिया सेन्सेशन आणि उरी या चित्रपटातील बालकलाकार रीवा अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.

तिच्या वयाबद्दल अनेक वेळा वाद होताना पाहायला मिळतात. तिचे वय किती, ती तिच्या वयाच्या मानाने मोठी दिसते.. यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल बरेचदा विचारला जातो.

रिवाने वयापेक्षा मोठे दिसण्यासाठी जाणूनबुजून हार्मोन्सशी संबंधित काही शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन्स घेतली आहेत का, अशाही चर्चा मधल्या काळात रंगल्या होत्या.

रिवाच्या बाबतीत कितीही चर्चा रंगत असल्या तरीही ती मात्र आपल्या सौंदर्याने आणि बोल्ड अॅटीट्यूडने सर्वांना मोहित करून टाकत असते.

नुकताच तिने स्वत:च्या घरातील बेडरूममध्ये एक फोटोशूट केला आहे. या फोटोशूट मध्ये तिने नाइटसूट घातला असून पोज दिल्या आहेत.

अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ती लवकरच तिचे वय उघड करणार आहे. पण गुगलवर सर्च केल्यास तिची जन्मतारीख १ फेब्रुवारी २००६ अशी दाखवली जाते.

त्यानुसार रिवा अरोरा ही १८ वर्षांची असल्याचा निष्कर्ष काढता येतो. अशातच तिच्या काही ताज्या इंस्टाग्राम पोस्ट नीट पाहिल्या तर ही गोष्ट नक्कीच लक्षात येते की ती आता लहान राहिलेली नाही.