वयापेक्षा मोठं दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स घ्यायची हंसिका मोटवानी, आता सौदर्याने करते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:00 PM2021-08-09T19:00:00+5:302021-08-09T19:00:00+5:30

2007 साली हंसिका मोटवानी हिमेश रेशमियासोबत 'आपका सुरूर' या सिनेमा झळकली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. वयापेक्षा मोठी दिसत असल्याने अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

'आपका सुरूर' सिनेमाचे नाव काढताच आठवते ती अभिनेत्री हंसिका मोटवानी.

हंसिकाने तिच्यापेक्षा वयाने 18 वर्षांनी मोठ्या हिमेशसोबत रोमान्स केला होता.

इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून प्रसिद्ध असेलेली हंसिका अचानक अभिनेत्री बनत रसिकांच्या समोर आली.

छोटा पडदा गाजवल्यानंतर 2003 साली तिला हृतिक रोशनचा 'कोई मिल गया' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती.

या सिनेमात हंसिकाने बालकलाकाराची भूमिका निभावली होती. तिच्या भूमिकेचेही कौतुक झाले होते.

वयाने मोठे दिसण्यासाठी हंसिकाने हार्मोनल इंजेक्शन्स घेतल्याची चर्चा त्यावेळी प्रचंड रंगली होती.

यावर हंसिका किंवा तिच्या कुटुंबीयांनी काहीही बोलण्यास नकार दिला होता.

तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील हंसिका प्रसिद्ध नाव आहे.

2007 साली हंसिका 'देसमुदुरु' या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती.

तिला साऊथचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

या सिनेमानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिची फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली होती.