Divya Khosla Kumar Photos: टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या पत्नीचं बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:54 PM2022-05-25T16:54:33+5:302022-05-25T17:00:01+5:30

Divya Khosla Kumar Photos: टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. 34 वर्षाच्या दिव्याच्या बोल्डनेसपुढे टॉपच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील.

टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. 34 वर्षाच्या दिव्याच्या बोल्डनेसपुढे बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीही फिक्या पडतील.

अलीकडे दिव्या ‘डिझाईनर’ गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा बोल्ड आणि रिव्हिलिंग ड्रेस पाहून सगळेच थक्क झालेत.

इन्स्टावरही दिव्याने या ड्रेसमधील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. यात दिव्या गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये किलर पोझ देताना दिसतेय.

लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळलेली दिव्याने ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटातून कमबॅक केलं होतं. या चित्रपटात दिव्या मुख्य हिरोईनची भूमिका साकारताना दिसली होती.

2004 साली अनिल शर्माच्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथींयों’ या चित्रपटाद्वारे दिव्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याचवर्षी ‘लव्ह टुडे’ या साऊथच्या चित्रपटाद्वारे तिने टॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

2005 मध्ये तिने टी सीरिजचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारसोबत लग्न केलं. दोघांनाही एक मुलगा झाला.

लग्नानंतर दिव्याने अभिनय सोडून निर्मिती आणि दिग्दर्शनात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. रॉय, खानदानी शफाखाना, बाटला हाऊस, मरजांवा असे अनेक चित्रपटाची निर्मिती तिने केली.

2014 मध्ये तिने दिग्दर्शनात पाऊल ठेवत, ‘यारियां’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. 2016 मध्ये ‘सनम रे’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही तिने केलं.