'तुझे मेरी कसम'ने बदललं जिनिलिया-रितेशचं आयुष्य; पाहा क्युटेस्ट कपलचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 01:08 PM2024-01-04T13:08:29+5:302024-01-04T13:39:37+5:30

रितेश आणि जिनिलिया ही मनोरंजनसृष्टीतील आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते.

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून रितेश आणि जिनिलीया देशमुखला सर्वत्र ओळखलं जातं.

रितेश आणि जिनिलिया यांनी काही वर्ष एकमेंकाना डेटिंग केल्यानंतर 2012 साली लग्नबंधनात अडकले. पण अजूनही ही जोडी आपल्याला प्रेमात पाडते.

2003 साली आलेल्या 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या शूटवेळी दोघांची पहिली भेट झाली होती. या सिनेमात दोघंही मुख्य भूमिकेत होते.

'तुझे मेरी कसम' हा ३ जानेवारी २००३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २१ वर्ष पूर्ण झालीत.

यातील रितेश जिनिलियाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली होती.

'तुझे मेरी कसम' सिनेमाला २१ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त रितेशने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली.

त्याने या सिनेमा दरम्याने काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

यानंतर 'वेड' सिनेमात रितेश आणि जिनिलिया यांची जोडी अनेक वर्षांनी पाहायला मिळाली होती.

रितेश आणि जिनिलीयाला रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत. मुलांवरील संस्कार पाहून महाराष्ट्रातील जनतेला त्यांचं कौतुक वाटतं.