हुबेहूब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली बेंद्रेचा मुलगा; आता दिसतो अधिकच हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:45 AM2022-05-31T10:45:40+5:302022-05-31T10:51:05+5:30

Sonali bendre son: सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, रणवीर लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो.

उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांचा संगम असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे.

९० च्या काळात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत सोनालीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.

गेल्या काही काळात सोनालीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, कायम ती नेटकऱ्यांचं चर्चेत येत असते.

सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.

सध्या सोनालीसह तिचा लेक चर्चेत येत आहे. सोनालीचा मुलगा आता चांगलाच मोठा झाला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

सोनालीच्या मुलाचं नाव रणवीर असं असून तो कलाविश्वापासून दूर आहे.

रणवीर सोशल मीडियावर सक्रीय असून तो त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो.

आई-वडिलांसह रणवीरने सुंदर फॅमिली फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, रणवीर लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो.

सोनालीने अलिकडेच द ब्रोकन न्यूजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं. (सर्व फोटो: सोनाली आणि रणवीर यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन)