श्वेता तिवारीची मुलगी पलक म्हणतेय, कोई लौटा दो मुझे बचपन के वो दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 05:46 PM2021-01-09T17:46:09+5:302021-01-09T17:46:09+5:30

श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिला प्रचंड लोकप्रियता आहे.

पलकने शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पलकने स्कर्ट घातलेला तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या फोटोसोबत तुम्ही देखील शाळेला मिस करत असाल तर शाळेच्या युनिफॉर्ममधील स्कर्ट घाला असे तिने लिहिले आहे.

पलकचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

श्वेता तिवारीने छोट्या पडद्यावर तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची मुलगी बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.

पलक 'रोजी : द सॅफरन चॅप्टर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अभिनेता विवेक ऑबेरॉय पलकला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे.

पलकच्या पहिल्या चित्रपटासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.