PHOTOS: सलमान खानची अभिनेत्री आता मराठी कलाविश्वात आजमावणार नशिब, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 02:27 PM2022-08-25T14:27:33+5:302022-08-25T19:10:22+5:30

सलमान खानच्या अभिनेत्री बॉलिवूडनंतर आपला मोर्चा मराठी सिनेइंडस्ट्रीकडे वळवला आहे. जाणून घ्या तिच्याविषयी.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यापैकीच ही एक अभिनेत्री आहे. जी अभिनेत्री होण्याआधी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करीत होती.(फोटो इन्स्टाग्राम)

एक दिवस बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य तिच्याकडे लक्ष गेले. पुढे त्यांनी तिला त्यांच्या डान्सिग ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. (फोटो इन्स्टाग्राम)

तब्बल दोन वर्षे गणेश आचार्यच्या ग्रुपमध्ये तिने डान्सर म्हणून काम केले. पुढे त्यांची डान्स असिस्टंट म्हणूनही तिने काम केले.(फोटो इन्स्टाग्राम)

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून डेजी शाह आहे. डेजीने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. आज डेजी तिचा ३७ वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय. (फोटो इन्स्टाग्राम)

डेजीने सलमान खानच्या जय हो सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. जय हो' सिनेमातून डेजीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. यात ती सलमानच्या अपोझिट दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

जय हो'नंतर 'हेट स्टोरी ३' आणि 'रेस ३' मध्येही दिसली होती. अलीकडेच तिने मराठीत सिनेमात ही झळकली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

अंकुश चौधरी आणि पूजा सावंतच्या 'दगडी चाळ २' मधल्या 'राघू पिंजऱ्यात आला' (raghu pinj ryat ala) हे गाण्यात डेझी शाह झळकली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

त्यामुळे बॉलिवूडनंतर डेजी आता मराठी सिनेमात नशीब आजमावताना दिसतेय. (फोटो इन्स्टाग्राम)