रेमो डिसुझाने आजारपणावर मात केल्यानंतर पत्नी लिजेलसोबत धरला ताल, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 06:28 PM2020-12-26T18:28:34+5:302020-12-26T18:28:34+5:30

गेल्या 11 डिसेंबरला बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसुजाला हृदयविकाराचा झटका आला.

रेमोला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पाठोपाठ त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

काही दिवसांच्या उपचारानंतर रेमोना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

सध्या रेमो कुटुंबासोबत वेळ घालवतोय. याचदरम्यान ख्रिसमस सेलिब्रेशनचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रेमो त्याची पत्नी लिजेलसोबत गाण्यावर ताल धरताना दिसत आहे.

रेमोचे वजन चांगलेच कमी झाले असल्याचे आपल्याला या फोटोंमधून दिसून येत आहे.