सिनेमात झळकत नसली तरी करोडोंची मालकीण आहे ही अभिनेत्री, दुसऱ्यांदा थाटणार संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 01:34 PM2021-09-11T13:34:03+5:302021-09-11T13:43:08+5:30

चंदेरी दुनियेत ब्रेकअप आणि पॅचअप, घटस्फोट या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. पूजा बेदीही तिच्या रिलेशशिपमुळे सतत चर्चेत असते.

पूजा आणि मैनेकच्या नात्याची चर्चा जोरात होती. अखेर पूजाने मैनेकसह साखरपुडा केल्याचे जाहीर केले होते.

2003 साली पूजाने पहिला पती फरहान फर्नीचरवालाशी काडीमोड घेत वेगळी झाली होती.

पूजा आणि फरहान यांना दोन मुले आहेत.घटस्फोटानंतर पूजाची अनेक अफेअर गाजली.

अभिनयापेक्षा आपल्या फटकळ वक्तव्यांमुळे अन् पर्सनल लाइफमुळेच ती अधिक चर्चेत राहिली आहे.

पूजाच्या पहिला घटस्फोटाला आता 16 वर्ष झाली आहेत.

पूजा बेदी आता सिनेमांपासून दूर असली तरी करोंडोंची मालकीण आहे.

गोव्यामध्ये तिचा व्यवसाय आहे. त्यामुळे मुंबईपेक्षा ती गोव्यातच जास्त राहते.

पूजा बेदी २०० कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.

तुर्तास मनेकसह तिचा साखरपुडा झाला असला तरी लग्नाची तारिख अजुन समोर आलेली नाही.