‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावतचा बदलेला लुक पाहून चाहते थक्क, म्हणाले- हे शक्य नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:57 PM2022-06-29T15:57:55+5:302022-06-29T16:21:41+5:30

Mallika Sherawat : मल्लिका शेरावतचा लेटेस्ट फोटो समोर आल्यानंतर तिचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क झालेत.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) ने 'मर्डर' सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मीसोबत बोल्ड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. (Photo Instagram)

ती केवळ पडद्यावरच नाही तर रिअल लाइफमध्येही बोल्ड आहे. याचा पुरावा तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिल्यावर मिळतो. (Photo Instagram)

बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. (Photo Instagram)

अभिनेत्रीचा एक नवीन फोटो समोर आला आहे, जो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. (Photo Instagram)

त्यात 'मर्डर गर्ल' ओळखता येत नाहीये. मल्लिकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. (Photo Instagram)

मल्लिकाने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टा हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले होते, फोटोमध्ये मल्लिका तिच्या घराच्या सोफ्यावर हिरव्या रंगाचा प्रिंटेड नाईट सूट परिधान करून पडली आहे. (Photo Instagram)

फोटोमध्ये मल्लिकाही हातात कॉफीचा मग आहे. यासोबतच तिचं आलिशान घरही फोटो दिसतेय. (Photo Instagram)

मल्लिका शेरावतचा लेटेस्ट फोटो समोर आल्यानंतर तिचा बदललेला लूक पाहून काही चाहते थक्क झाले आहेत. (Photo Instagram)

काहींचे म्हणणे आहे की ती आजही तितकीच ग्लॅमरस दिसते. फोटोंवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, "हे शक्य नाही. इतक्या वर्षांनंतरही कोणी तसेच कसे दिसू शकते". (Photo Instagram)