भाईजानच नाही तर 'ही' 52 वर्षीय अभिनेत्री सुद्धा आहे अविवाहित, सुपरहिट सिनेमांमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 05:32 PM2024-01-26T17:32:55+5:302024-01-26T17:44:58+5:30

अभिनेत्रीवर आजही लाखो चाहते फिदा असतात.

सलमान खान बॉलिवूडमधला मोस्ट बॅचलर अभिनेता आहे. वयाच्या 58 व्या वर्षीही तो सिंगलच आहे. त्याने आजपर्यंत लग्न केले नाही. यावरुन त्याची खूप चेष्टाही केली जाते. सलमान तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहे. मुली त्याच्यावर फिदा आहेत मात्र तरी तो खाजगी जीवनात एकटा आहे.

फक्त सलमानच नाही तर इंडस्ट्रीत एक अभिनेत्रीही आहे जी वयाच्या 52 व्या वर्षीही अविवाहित आहे. होय, तिनेही आजपर्यंत लग्न केलेले नाही. मात्र तिने सलमानप्रमाणेच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

ही अभिनेत्री आहे तब्बू. तब्बू सध्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये दिसत आहे. 90 च्या दशकात सुपरहिट हिरोईन म्हणून नावारुपास आलेली तब्बू आजही एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे देत आहे. तब्बूने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती.

आपल्या करिअरमध्ये तब्बूने बऱ्याच अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र आजपर्यंत सलमान खान आणि तिची जोडी बनली नाही. सलमानच्या वहिनीच्या भूमिकेत ती दिसली होती मात्र त्याच्यासोबत पडद्यावर अद्याप रोमँटिक लव्हस्टोरी केलेली नाही.

तब्बू आणि सलमानने तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. 'हम साथ साथ है', 'भारत' आणि 'जय हो'. या चित्रपटात ती सलमानची कधी वहिनी तर कधी बहिणीच्या भूमिकेत दिसली. चाहते अजूनही दोघांची रोमँटिक जोडी बनेल या प्रतिक्षेत आहेत.

सलमान खानने त्याच्या आयुष्यातील चढ उतारांमुळे कधी लग्न केले नाही. मात्र तब्बूने अद्याप लग्न न करण्यामागचं कारण कधी उघड केलं नाही. तिने अनेकदा हा प्रश्नच टाळला.

तब्बू आणि अजय देवगणची जोडी एकेकाळची हिट जोडी होती. तेव्हा दोघांच्या अफेअरच्या चर्चाहीव गाजल्या होत्या. तब्बूने याच कारणाने आजपर्यंत सिंगल आहे असंही म्हटलं गेलं.

आजही दोघं दृश्यम, गोलमाल अगेन सारख्या सिनेमांमध्ये दिसले आहेत. यातही त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे. एकदा तब्बूने गंमतीत म्हटले होते की अजय देवगण सेटवर माझ्या आसपास कोणत्याही मुलाला फिरकू द्यायचा नाही म्हणूनच मी आजपर्यंत सिंगल आहे.