PICS: 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आजही सौंदर्याच्या बाबतीत देते बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 04:41 PM2021-04-07T16:41:38+5:302021-04-07T16:49:56+5:30

अलीकडेच माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत जे वेगाने व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये माधुरीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. माधुरीचे हे फोटोशूट चाहत्यांना आवडले आहे. (Photo Instagram)

माधुरी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर अक्षरशः राज्य करत आहे. (Photo Instagram)

‘एक दो तीन’ मुळे प्रसिद्ध झालेला ‘तेजाब’ या चित्रपटातून माधुरीच्या करिअरच्या यशाचा आलेख वाढत गेला. (Photo Instagram)

दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या. (Photo Instagram)

1999 मध्ये तिने डॉ़ राम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. (Photo Instagram)

माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते. (Photo Instagram)

सध्या ती टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने ३ची परीक्षक आहे. (Photo Instagram)