एजाज करतोय 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट; एकेकाळी केली होती अनिता हंसनंदानीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:59 AM2022-08-28T11:59:01+5:302022-08-28T12:01:53+5:30

Eijaz khan: एकेकाळी एजाज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हंसनंदानीला डेट करत होता. मात्र, काही कारणास्तव ही जोडी विभक्त झाली. एका मुलाखतीत अनिताने याविषयी भाष्य केलं होतं.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे एजाज खान. अनेक मालिकांमध्ये झळकलेला एजाज आज कोणासाठीही नवीन नाही.

१९९९ मध्ये तक्षक या चित्रपटातून एजाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.

'कुछ ना कहो', 'जस्ट मॅरिड', 'तनु वेड्स मनू', 'जिला गाजियाबाद', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.

बॉलिवूडमध्ये नाव कमावलेला एजाज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेतादेखील आहे. त्याने 'कुसुम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कोई दिल में है', 'केसर', 'कसौटी जिंदगी के', 'काव्यांजलि', 'कुमकुम-प्यारा सा बंधन', 'कसम से', 'कयामत', 'लव ने मिला दी जोड़ी', 'दिया और बाती' या सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

बिग बॉस 14 या शोच्या माध्यमातून एजाज विशेष चर्चेत आला. या शोमध्ये त्याने त्याच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफविषयीदेखील अनेक खुलासे केले.

आज एजाज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत असून सोशल मीडियावर त्याची लव्ह लाइफ चर्चेत आली आहे.

एकेकाळी एजाज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हंसनंदानीला डेट करत होता. मात्र, काही कारणास्तव ही जोडी विभक्त झाली. एका मुलाखतीत अनिताने याविषयी भाष्य केलं होतं.

काव्यांजली या मालिकेदरम्यान एजाज-अनिता यांचं सूत जुळलं होतं. मात्र, दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते विभक्त झाले.

सध्या एजाज त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत आहे.

एजाज अभिनेत्री पवित्रा पुनियाला डेट करत आहेत. बिग बॉसपासून या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली आहे.